Saturday, May 26, 2012

मनाचा ताबा मेंदूवर असतो.. आणि मेंदूचा ताबा शरीरावर असतो...


मनाचा ताबा मेंदूवर असतो..
आणि मेंदूचा ताबा शरीरावर असतो...

देह आणि मनाचा संबध अतूट आहे..एक रोग ग्रस्त झाले की त्याच्या पाऊल खुणा दुस-यावर उमटतात..हे कसे शक्य आहे..?
पहा...
एकदा अकबर बादशाहने शेळीला सकस आहार देऊन तिचे वजन वाढायला नको अशी पैंज लावली आणि बिरबलाने ते आव्हान स्विकारले...
अकबर बादशाहला वाटले की आता लवकरच बिरबल आपल्याला शरण येऊन पैज हारेन..
अगदी दुस-या दिवशी बिरबलाने वाघाच्या पिंज-या समोर बकरीला बांधुन तिचा सकस आहार चालू ठेवला...त्यानंतर ब-याच कालावधी नंतर काही दिवसात दरबार भरला
आणि अकबर बादशाहने शेळीला सकस आहार देऊन तिचे वजन वाढायला नको अशी पैंज लावल्याची आठवण बिरबलाला करुन दिली..यानंतर
 अकबर बादशाह आणि बिरबल दोघंही बकरी आणि वाघ जिथे बांधले होते तिथे ऊभे राहिलेत..त्याक्षणी अकबर बादशाहला हे द्दॄश्य पाहुन आश्चर्य वाटले..
कारण सकस आहार घेऊनही बकरीचे वजन कमी झाले होते.. हे पाहुन अकबर बादशाह स्तंभित होऊन फ़क्त बघतच राहिला...
याचा मतितार्थ शारिरीक आरोग्य हे केवळ संतुलित आणि पौष्टिक सकस आहारानेच केवळ आरोग्य प्राप्ती होणार नाही त्यासाठी मानसिक आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे...
                                                                                                                 
लेखक: सचिन निकम.                            

Friday, May 25, 2012

जग निर्माण झाल्यानंतर


जग निर्माण झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवशीच ईश्वराने एक कुत्रा निर्माण केला आणि देव त्याला म्हणाला " प्रत्येक दिवशी तु घरा जवळ बसुन रहा आणि येणा-या किंवा
जाणा-यावर भुंकत बैस..देव म्हणाला मी तुला २० वर्षाचे आयुष्य  प्रदान करतो आहे...पण त्या क्षणी कुत्रा म्हणाला " २० वर्षात मला संपुर्ण आयुष्यभर भुंकावे लागेल ..त्यापेक्षा त्यातले फ़क्त १० वर्षाचे आयुष्य मला दे..आणि उर्वरीत दहा वर्ष मी तुला  साभार परत करत आहे...
हे ऐकून देव त्या कुत्र्याला म्हणाला जशी तुझी ईच्छा.. आणि  म्हणाला.."तथास्तु"
दुस-या दिवशी ईश्वराने एक माकड निर्माण केले आणि देव त्याला म्हणाला "तू लोकांचे मनोरंजन कर...माकडचेष्टा आणि गमंतीनीं सर्वांना हसव...त्यासाठी मी  २० वर्षाचे आयुष्य तुला प्रदान करतो आहे...पण त्या क्षणी माकड म्हणालं "माकडचेष्टांसांठी  २० वर्ष घालवु..? मला ईतके आयुष्य केवळ माकडचेष्टां मध्ये घालवणे मंजूर नाही..जर कुत्र्याने १० वर्षाचे आयुष्य ज्या प्रमाणे तुला परत केले  त्याच प्रमाणे मी सुध्दा माझ्या आयुष्यातले उर्वरीत दहा वर्ष  तुला  साभार परत करत आहे...
हे ऐकून देव त्या माकडाला म्हणाला जशी तुझी ईच्छा.. आणि  म्हणाला.."तथास्तु"
तिस-या दिवशी ईश्वराने एक गाय निर्माण केली आणि देव म्हणाला "तुला शेतक-या सोबत शेतावर  उन्हां-तांन्हात  दिवसभर उभे रहावे लागेल आणि तुला वासरुही जन्माला घालावे लागतील..तसेच तुला दूधही द्यावे लागेल..सर्वार्थाने तुला शेतक-याला आधारच द्यावा लागेल त्यासाठी "मी  ६० वर्षाचे आयुष्य तुला प्रदान करतो आहे.." हे, ऐकून गाय म्हणाली, " धन्यावाद..देवा ! "  मला तु शेतक-याच्या सेवेसाठी जे काही ६० वर्षांचे आयुष्य प्रदान केले आहे त्याबद्दल..! पण मला ६० वर्षातले फ़क्त २० वर्षांचेंच आयुष्य दे.. मी सुध्दा माझ्या आयुष्यातले उर्वरीत ४० वर्ष  तुला साभार परत करते आहे...
हे ऐकून देव त्या गायीला म्हणाला जशी तुझी ईच्छा.. आणि  म्हणाला.."तथास्तु"
चवथ्या दिवशी ईश्वराने एक माणूस निर्माण केला आणि देव त्याला म्हणाला " खा ...झोप...खेळ...लग्न करुन जीवनातला संसारिक आनंद घे...त्यासाठी "मी  २० वर्षाचे आयुष्य तुला प्रदान करतो आहे.." हे, ऐकून माणूस म्हणाला, "..काय देवा...? काय म्हणालास..फ़क्त २० वर्षांचे आयुष्य ...! फ़क्त २० वर्षांचेंच आयुष्य...!! नाही नाही ..असे  मला कदापि चालणार नाही देवा "...मी तुला सांगतो.. तु दिलेले २० वर्षांचे आयुष्य तर आहेच त्यात तुला  ४० वर्ष गायीने परत केलेले आहे समज.!..तसेच तुला माकडाने आणि कुत्र्याने  २० वर्ष परत केलेच आहे असे सर्व मिळुन  एकूण ८० वर्ष होतात ..मग माझ्या म्हणण्याप्रमाणे ८० वर्षाचे आयुष्य मला  तरी प्रदान कर ..मी जास्त आयुष्याची तुला भीक मागतो देवा... !"
हे ऐकून देव त्या माणसाला म्हणाला जशी तुझी ईच्छा.. आणि देव  म्हणाला व्यावहारिक दॄष्या तु एक चांगली देवाण-घेवाण केलीस.."तथास्तु"
वरील कथेचा मर्म लक्षात आलाच असेल... म्हणुन की काय..? माणुस आपल्या आयुष्यातील पहिले २० वर्ष  खाणे..झोपणे..खेळणे आणि मौजमजा करण्यात घालवत असतो...
आयुष्यातले पुढील ४० वर्ष उन्हा-तान्हात काम करुन परिवाराचे पालन पोषण करुन त्याला आधार देतो. त्यापुढील आयुष्यातले १० वर्ष माणूस  माकडचेष्टा करुन आपल्या नात-नातवंडांचे मनोरंजन करतो आणि आयुष्यातली शेवटची १० वर्ष घराच्या पुढील व्हरांड्यात बसुन प्रत्येकावर नजर ठेवुन ओरडत बसतो..!

Saturday, May 19, 2012

जोक: मास्तर आणि बंड्या...!



मास्स्तर: सांग बंड्या एखादी मधमाशी जर U.S प्रांतात अर्थात अमेरिकेला गेली तर तिला काय म्हणशील..?
बंड्या: मास्तर ऊत्तर लई सोप्प आहे...  " USB "

Sunday, May 13, 2012


टिचर आणि सांता.. 

टिचर...: सांग सांता , मैं आम आदमी नहीं हूं। या हिंदि वाक्याचे ईंग्रजीत भाषांतर कसे करशील बरं...?
सांता: सोप्प आहे मँम: I ' m not a mango man !
टिचर...: आता निट सांग.. मुझे भी इंग्लिश आती है।  ईंग्रजीत भाषांतर कसे करशील बरं...?
सांता:   सोप्प आहे मँम:  English comes to me also!

Wednesday, May 9, 2012

ईच्छा लवकर मरुन जाईन..!


पेशंट: डाँक्टर एखादा उपाय सांगा ज्याच्याने माझ्यात जास्त जगण्याची ईच्छा ऊपन्न होईन...!
डाँक्टर: तर मग लग्न करुन टाक...!
पेशंट: मग खरच त्यामुळे माझी जास्त जगण्याची ईच्छा ऊपन्न होईन ....!!
डाँक्टर: छे.... छे ...त्यामुळे जास्त जगण्याची निर्माण झालेली ईच्छा लवकर मरुन जाईन..!

Tuesday, April 24, 2012

अजित ..राबर्ट..मोना...विनोद!



हिदिं चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्टशैलीने गाजलेला अभिनेता अजित हा डाँयलाँगमुळे प्रसिध्द पावला.

अजित हा त्याच्या सेक्रेटरीवर काहीसा नाराज असल्याने तो राँबर्टला म्हणतो...!

अजित: मोना के दोनो हात काट दो राँबर्ट ..

राँबर्ट: मगर क्यु बाँस...!

अजित:राँबर्ट उसे टायपिंग नही आती ...कम से कम शाँर्टहँन्ड तो सिख लेगी....!

Saturday, March 17, 2012

मुन्नाभाई आणि सर्किट..

मुन्नाभाई: अरे सर्किट हे डाँक्टर लोक पेशंटच्या आँपरेशनच्या वेळी त्यांना बेशुध्द का बरं करत असतील..?
सर्किट: फ़ारच सिंपल आहे भाई.. पेशंटने जर आँपरेशन शिकुन घेतले तर... डाँक्टर लोकांची वाट लागुन जाईल ना भाई...!

Tuesday, February 28, 2012

मी तुमच्याशी बोलणारच नाही

बंडोपंताची पत्नी: (रागात) आज नंतर मी तुमच्याशी बोलणारच नाही.
बंडोपंत: काय तु मुकी होणार आहे का..?
बंडोपंताची पत्नी: नाही ..नाही मी तुम्हाला बहीरे करणार आहे.

Sunday, February 26, 2012

स्क्रैच करा आणि उत्तर मिळवा.


संता एकदा परिक्षेला बसला आणि त्याला त्या पेपरात नेमक्या एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते...त्यावर संताने उत्तरात असे लिहिले-
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||| स्क्रैच करा आणि उत्तर मिळवा.

Monday, February 20, 2012

तु कसे निंबू तोडशील..बरं ?


टीचर: बोल राजू समुद्रात जर निंबूच झाड असेल तर तु कसे निंबू तोडशील..बरं ?
राजू: सर सोप्प आहे मग मी पक्षी बनेल..!
टीचर: तुला माणसा पासुन पक्षी काय तुझा बाप बनवेल ..?
राजू: तर मग समुद्रात निंबूच झाड काय तुमचा बाप लावेल..?

Friday, February 17, 2012

मागच्या कार्यक्रमासारखा दर्द नव्हता...

प्रेक्षक: गायकाला...आज आपल्या आवाजामध्ये मागच्या कार्यक्रमासारखा दर्द नव्हता...


गायक: त्याच काय आहे ना..? मी दर्द देण्या-या दाताला उखडुन फ़ेकले आहे.

Sunday, February 12, 2012

तु मला धोका दिला आहे...


सांता: तु मला धोका दिला आहे...
बंता:  नाही सरजी ...मी तर तुम्हाला चांगल्या ..उत्तम अशा क्वालिटीचा रेडिओ दिला होता.
सांता: पण त्यावर लिहले आहे मेड ईन चायना...आणि चालू केल्यावर बोलतो आहे..ऑल इंडिया रेडियो.

Sunday, February 5, 2012

सांग बर समोरचा प्राणी बकरा आहे की बकरी आहे...

चिंटू: सांग बर समोरचा प्राणी बकरा आहे की बकरी आहे...

मिंटू: अगदी सोप्प आहे ...अगोदर दगड मार.. पळाला तर बकरा आहे..आणि पळाली तर बकरी आहे..

Monday, January 23, 2012

आत्ताशी तर आमची मुलगी शिक्षण घेत आहे..!


मुलवाले: (शेजा-याला म्हणतात) : आम्हाला आपल्या शेजारची मुलगी पसंद आहे...ते तिचे लग्न केव्हा करणार आहेत..?
शेजारचे : (मुलवाल्यांना): नाही.. नाही... आत्ताशी तर आमची मुलगी शिक्षण घेत आहे..!
मुलवाले: (शेजा-याला म्हणतात) :तर मग आमचा मुलगा काय बंदर आहे जो तिचे पुस्तक फ़ाडुन टाकेल...!

Saturday, January 21, 2012

उठायला इतका उशीर लागला..?

शेठाणी (नोकराणीला): काय महाराणीजी आज कामावर यायला इतका उशीर का लावला..?
नोकराणी: शेठाणीजी मी तर जीन्याच्या पाय-यांवरुन पडुन गेले होते.
शेठाणी: तर मग तुला तिथुन  उठायला इतका उशीर लागला..?