माणूस म्हटला की अनेक गोष्टींचा ऊहापोह करावासा वाटतो. प्रत्येकाचा दॄष्टीकोन जीवनाकडे बघण्याचा
वेगळा असू शकतो.अनेकांचे मन निरर्थक शंका बाळ्गू्न असू शकते! बरेच जण म्हणतात आम्ही खूप
चिकित्सक बूद्धिचे माणसं आहोत.खरं तर मानवी मन हे अनेक ब-या वाईट घटनांमूळे चिकित्सक
बनते.आपल्या ईकडे म्हण आहे ‘‘ की तोंड पोळल्यावर माणूस ताकही फ़ुकूंन पितो”
एका महात्म्याने म्हटलेच आहे की, “तूम्ही अगोदर मनात शंका न ठेवता वागा म्हणजे तूमच्या मनावरचा
ताण लवकर नष्ट होईल.जीवन जगतांना अनेक बाबी केवळ आत्मपरिक्षणाने आपल्याला कळून येतील.
एक गोष्ट लहानपणी आमच्या पाठ्य पूस्तकात होती.एक बाई पाणी भरत होती तिने तिच्या घरात एक मुंगूस पाळला होता.त्यादिवशी ती पाणी भरण्यासाठी बाहेर जाण्या अगोदर तिच्या बाळाजवळ सरंक्षण म्हणून तिने त्या पाळलेल्या मुंगूसाला बाळाजवळ सोडून ती पाणी भरण्यासाठी बाहेर गेली.
काही वेळानेच ती पाण्याचा हंडा घेवून घराकडे येऊ लागली पण दाराजवळ तिला एक दॄष्य दिसले की दारातून
तो मुंगूस निघत होता त्याचे तोडं लाल रक्ताने माखलेले होते. बाई तर खूपच घाबरलेली होती तिच्या मनात शंका
आली की या मुंगूसानेच आपल्या बाळाला खाल्ले म्हणून तिने पटकनं त्या मुंगूसाला काठीने मरेस्तोवर मारले.
मुंगूस मेल्यावरच तीने घरात प्रवेश केला अन पाहीले तर काय? बाळ तर हसतं खळतं होत पण त्याच बरोबर
तिने बाजूला पाहिले तिथेच एक मोठा विषारी नाग रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडला होता.
यावरुन विचार करा, कॄति करण्या अगोदर विचार किती महत्वाचा आहे. शंकमूळे काय झाले ?
ज्या मुंगूसाने त्या सापाशी झूंज देऊन तिच्या बाळाला वाचवले शेवटी तिनेच त्याला मारले.
म्हणून गीते मध्ये भगवान श्रीकॄष्ण म्हणतात “ संशयात्मा विनश्यति”
तसेच श्रीकॄष्ण म्हणतात “ श्रध्दावान लभते ज्ञानंम”प्रा.सचिन दिनकर पाटील
Tuesday, November 20, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)

निवडणूका पुर्वीचा हा ऊष्ण आजार आहे...हा थांबायला एकच ऊपाय..तो म्हणजे निवडुन येणे..बस्स...













1 comments:
मी आपले ब्लाग वाचले. आपण फारच सुंदर लिहीतात. आपले साहित्य वाचून आनंद व एक वेगळा द्दष्टीकोन निर्माण होतो. मी दि.१०/११/२००७ च्या सकाळ मधिल ’मराठी ब्लाग कसा सुरू कराल ?’ हा लेख वाचला व प्रयत्न करून पाहिला व त्यात यशस्वी झालो. आपला फार आभारी आहे. धन्यवाद!
Post a Comment