Tuesday, December 4, 2007

आम्ही ब्लाँगर ब्लाँगर

आम्ही ब्लाँगर ब्लाँगर
या ईटंरनेटची पाखंर!
मराठी दूनियेवर नजर
मराठी ब्लाँग जगात सर्वदुर..
प्रा.सचिन दिनकर पाटील.


नमस्कार मंडळी,
आमचा राम राम घ्या वा की,
मराठी ब्लाँग नेट आज जगात सर्वदुर पाहिला जातो. मराठी विश्वातला हा ब्लाँग लई झक्कास आहे. मराठी ब्लाँग
सुरु करण्यासाठी मला या मराठी ब्लाँग नेटमूळेच मार्गदर्शन मिळाले.व्यवस्थापक मंडळीचे आभार मानावे तितके कमीच आहे.
मराठी ब्लाँग नेटमूळेच आपले सर्वांचे लेख जगाच्या कानाको-यात एका क्षणात पोहोचतो शिवाय याच्यामूळेच आपल्या साहित्याचे
सागोंपांग दर्शन मराठी ब्लाँगच्या वाचकाला होतो. पण एक लक्षात घ्या की या मराठी ब्लाँग नेटमूळेच निर्माण झालेले मराठी माणसांचे सर्कल फ़ार वाढत आहे मग मराठी ब्लाँग नेट मध्ये प्रसारित झालेल्या लेखांना वाचकांनी comments म्हणजे प्रतिसाद देण्यास एवढी कंजूषी का करावी? जय महाराष्ट्र! मराठी बाणा आपण का विसरतो ? नाही का??
गुड, टू गुड ,मिडिअम ,एवढी प्रतिक्रिया आपण जरुर देऊ शकतो ! ते सुध्दा नेट सर्फ़िंग करता करता.
सर्वच मराठी लेखकांचे ब्लाँगवरचे साहित्य खूप छान असते. त्यासाठी सर्वच ब्लाँग कर्ते आपापल्या परिने आपला ब्लाँग सजविण्यात मश्गूल आहेत.
खंरच मराठी ब्लाँग नेटवर मालिकांची एक जत्राच भरते.एक ज्ञानपूर्ण ,मनोरंजनाने भरलेली हा मराठी ब्लाँग नेट आता विशेष लोकप्रिय होत आहे. त्यांनाही मी शूभेच्छा देतो.
पूढे हा मराठी ब्लाँग दरवेळी अजून नवनवीन काही घेऊन येईल आणि हो आता तर २७ दिवसांनी हे वर्ष संपणार..
मग २००८ काय घेऊन येईल हे नवीन वर्षच ठरवणार !
चला मंडळी .. लई रात्र झाली...तुम्ही ही झोपा.. ऊद्यालाच ऊठा की... सकाळी आहेच आपल्या सेवेला मराठी बाणा..
चला मंडळी..भेटु तर मग ऊद्यालाच!
जय महाराष्ट्र !

जाता जाता एक चारोळी वजा आरोळी..

कॄत्रिम नाते
पैशावर बहरतात...
पैसा गेला की
ह्ळूवार
ती ही निसटतात...!
प्रा.सचिन दिनकर पाटील.

1 comments:

सुदेश रा. धोत्रे said...

नमस्कार

प्रा. सचिन पाटिल सर,

मला तुमच्या ब्लॉगवरील कविता खूप आवडल्या. अशाच चांगल्या कविता करत रहा. त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

आपला मित्र
सुदेश रा. धोत्रे.