Wednesday, December 12, 2007

आई उवाच....! स्त्री -सबला केव्हा होणार.


माझी ‘माउली ’अर्थात शुध्द मराठीत तिला आई म्हणूया! ती आता S.N.D.T. महाविद्यालयातून रिटायर्ड झाली. स्रीयांच्या जाणीवांचा अभ्यास शिकवतांना आणि जवळून अभ्यास करतांना तीने अनेक पिडित स्त्रीयांचा अभ्यास केला तिला जे जाणवलं ..ते ती लिहित असते.
मराठी विशेषतः मराठी स्री वर्गाने माझ्या या आईच्या व्यक्त केलेल्या लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवाव्यात.


स्त्री -सबला केव्हा होणार.

गेली हजारो वर्षे ‘पुरूष’ श्रेष्ठकसा , हे स्त्रीयांच्या मनांवर बिंबवल्याने नकळत स्त्रीत परावलंबीत्व निर्माण झाले. स्त्रीयांनी दुःख
मुकाट्यांन सहन करावी अस पातिव्रत्याच्या नावाखाली निर्माण झालेल्या कथांनी मनावर ठसवले‘ आदर्श स्त्री ची प्रतिमा निर्माण
करतांना नेमक तिला मन आहे याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळेच शांत पवित्र आज्ञाधारक,सोशीक, त्यागाची मूर्ती,निष्ठावान,भावना प्रधान,नाजूक, बलिदान करणारी ,शरण येणारी ही विशेषण स्रीची अलंकार ठरलेत.
मनुस्मॄतिवर आधारीत हिन्दुकायद्यान स्त्रीला लहानपणी वडीलांच्या... तरुणपणी नव-याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या अखत्यारीत ठेवलय.
खालील विधान किती खरं आहे बघा “यांनी इचारले माले,कोनाच्या नशीबाची? नव-याची की बापाच्या ! कुनाकुनाच्या हिश्याची.. कंदी बापाची दावन..नव-याचं पायतनं...पोरांबाळांच्या अगंनात बिन मोलाचं लोढंण...त्यांनी...इचारले माले, कोनाच्या तू नशीबाची? माझाच मला भरोसा...मी, वो माझ्या नशीबाची...!खरयं दुस-याच्या खांद्याचा आधार घेता..घेता ती शरीर विसरली.अन स्त्री शेवटी जगायचं शिकली. ते कुटुंबासाठी...तिच्या आवडी-निवडी कधीच मरुन गेल्यात..तिच्यातील स्त्रीत्वाचा अविष्कार,तेजस्वीपणा स्त्रीशक्ती सा-या सा-याचा तिला विसर पडला...हं!
पंडीता रमाबाई तर अभिमानानें म्हणतात.‘मला जाणीव आहे..मन आहे..सदसदविवेक बुध्दि आहे ...मी स्वतः विचार करणार आहे आणि देवान मला जे करण्याची क्षमता दिली आहे ते ते करणार आहे.
कायद्याची मदत घेतांना कायद्यावर कितपत अवलंबून राहायचे? हे स्त्रीयांना कायद्याच्या अभ्यासाने समजेल.स्त्रीयांमधील शक्ति हाच
स्त्रिचा खरा अधिकार आहे.
यावेळी स्त्री संघटनांमुळे स्त्रीयांच्या समस्यांना वाचा फ़ुटेल व आधार मिळेल तसेच कायद्यातील उणीवांचा अभ्यास करता येईल.

-प्रा.सुधा दिनकर पाटील.

---------------------------------------------------------------------
जळगावचे प्रसिध्द व विख्यात साहित्यीक स्व.प्रा. राजा महाजन सरांना
भाव सुमनांजली


(आहिराणीचा राजा गेला....
साहित्यिक हळहळले आहिराणी
भाषा माऊलीने डोळ्यातल्या
आसवांना वाट मोकळी केली...)

आहिरानी मायना राजा
मायले ईसरना
यानी लिन्ही गरुड झेप
उडीसन दूर गया
राननी डहायी राजासंगे
हाले - डुले
मोर - तितुर ह्याना संगे
नातं जोडे
मिठास वानी यानी
गुलाब संगे हसे
निंघनी वरात
गझलना जोडे बठे
जगन्नाथना रथ
रस्ता भरी चाले
सुर्यानी लेक
डोया झाकीसन दखे
साधा सुधा राजा
याना येवाना गाजावाजा
शांताबाई दूरथाईन
दखे पतीव्रता
आहिरानी मायनी
सेवा जलमभरी करी
हिरा मन्हा लखलख्नना
शिरना मुकुटवरी
उजेड दायीसन
मायना पांग फ़ेडा
हिरदना खजीना
समदासाठे लुटी दिन्हा
खिडकीमा बठीसन
दूर आभाय झांके
तारकास्ना संगे
पहाट उजाडे
राजाना राजबन्सी थाट
कीर्ती, पैसाले
फ़िरायी दिधी पाठ
निंधनी पालखी
समदास्ले उनं रडू...!
मुक्ताले सांगे
मनी वाट नको
दवाडू...

रचना: प्रा.सुधा दिनकर पाटील.

1 comments:

Mrs. Asha Joglekar said...

स्त्री सबला होतेच आहे. शहरातून तर तो आपण प्रत्यक्ष पहातोच आहे खेडयातली स्त्री ही जागरूक होते आहे पण प्रमाण खूप कमी आहे हे खरंय .
सचिन साहेब आपण वेळो वेळी माझ्या कवितांना उस्फू्र्त दाद दिली आहे त्य बद्दल धन्यवाद.