गच्चीवर ऊभं असतांना
तु म्हटंलीस
‘लागलं चंद्राला ग्रहण’...
तुला मी म्हटले
अगं..ते अण्णाचे डोके आहे..
जे टय़ूबलाईट्च्या पूढे
व्यापले आहे.....!
नमस्कार, जीवन हे अनेक तरंगाचे बनले आहे कधी हास्य तर कधी रुसवे-फ़ुगवे.. आणि खंर पहा..जेवणात नुसते रोज गोड असेल तर कसे वाटेल? अंदाज करा की भाजीत मीठं नसेल तर अळणीचं वाटणारं...म्हणून हास्य मेव जयते हे प्रत्येकाच्या जीवनातील भावतरंगाचे स्वछंद आणि लोभसं असं चित्रंण आहे त्यामूळे “हास्य मेव जयते” आपणा साठी एका मराठी ब्लाँगच्या रुपाने जीवनातील पचंपक्वानांच्या या अभिरुचीचा मनःपूर्वक आस्वाद आपणास घडवून देणार आहे. सचिन पाटील.
Monday, December 24, 2007
Tuesday, December 18, 2007
मनगट भंग योग..
त्याने गार्डनमध्ये तिला
नेऊन म्हटले
‘तुच माझी सखी...
असा आंबट फ़ेसकट
करुन
नकोस करु मला दुःखी ’...
‘ती म्ह्ट्ली दे तुझा
हात माझ्या हाती
म्हणजे
मला पटकन बांधता येईल राखी’...!
नेऊन म्हटले
‘तुच माझी सखी...
असा आंबट फ़ेसकट
करुन
नकोस करु मला दुःखी ’...
‘ती म्ह्ट्ली दे तुझा
हात माझ्या हाती
म्हणजे
मला पटकन बांधता येईल राखी’...!
Saturday, December 15, 2007
मिक्स चारोळी
Friday, December 14, 2007
स्वप्नातला चंद्र
स्वप्नातला चंद्र
नभात...नभात...चमकतो
तेव्हा गोड वाटतं....
अन
बेडवरची ऊशी खाली
सरकल्यावर
सार नभांगणच
टाळक्यात भणभणतं...
..........................................
रस्त्याने जातांना पती आणि पत्नीतला संवाद..
पत्नी: अहो एकलत ना ? मी म्हटंल ..."माझ्या, नातेवाईकांना नमस्कार करत चला..!"
पति: नमस्कार सासरे बुवा...!
Wednesday, December 12, 2007
आई उवाच....! स्त्री -सबला केव्हा होणार.

माझी ‘माउली ’अर्थात शुध्द मराठीत तिला आई म्हणूया! ती आता S.N.D.T. महाविद्यालयातून रिटायर्ड झाली. स्रीयांच्या जाणीवांचा अभ्यास शिकवतांना आणि जवळून अभ्यास करतांना तीने अनेक पिडित स्त्रीयांचा अभ्यास केला तिला जे जाणवलं ..ते ती लिहित असते.
मराठी विशेषतः मराठी स्री वर्गाने माझ्या या आईच्या व्यक्त केलेल्या लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवाव्यात.
स्त्री -सबला केव्हा होणार.
गेली हजारो वर्षे ‘पुरूष’ श्रेष्ठकसा , हे स्त्रीयांच्या मनांवर बिंबवल्याने नकळत स्त्रीत परावलंबीत्व निर्माण झाले. स्त्रीयांनी दुःख
मुकाट्यांन सहन करावी अस पातिव्रत्याच्या नावाखाली निर्माण झालेल्या कथांनी मनावर ठसवले‘ आदर्श स्त्री ची प्रतिमा निर्माण
करतांना नेमक तिला मन आहे याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळेच शांत पवित्र आज्ञाधारक,सोशीक, त्यागाची मूर्ती,निष्ठावान,भावना प्रधान,नाजूक, बलिदान करणारी ,शरण येणारी ही विशेषण स्रीची अलंकार ठरलेत.
मनुस्मॄतिवर आधारीत हिन्दुकायद्यान स्त्रीला लहानपणी वडीलांच्या... तरुणपणी नव-याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या अखत्यारीत ठेवलय.
खालील विधान किती खरं आहे बघा “यांनी इचारले माले,कोनाच्या नशीबाची? नव-याची की बापाच्या ! कुनाकुनाच्या हिश्याची.. कंदी बापाची दावन..नव-याचं पायतनं...पोरांबाळांच्या अगंनात बिन मोलाचं लोढंण...त्यांनी...इचारले माले, कोनाच्या तू नशीबाची? माझाच मला भरोसा...मी, वो माझ्या नशीबाची...!खरयं दुस-याच्या खांद्याचा आधार घेता..घेता ती शरीर विसरली.अन स्त्री शेवटी जगायचं शिकली. ते कुटुंबासाठी...तिच्या आवडी-निवडी कधीच मरुन गेल्यात..तिच्यातील स्त्रीत्वाचा अविष्कार,तेजस्वीपणा स्त्रीशक्ती सा-या सा-याचा तिला विसर पडला...हं!
पंडीता रमाबाई तर अभिमानानें म्हणतात.‘मला जाणीव आहे..मन आहे..सदसदविवेक बुध्दि आहे ...मी स्वतः विचार करणार आहे आणि देवान मला जे करण्याची क्षमता दिली आहे ते ते करणार आहे.
कायद्याची मदत घेतांना कायद्यावर कितपत अवलंबून राहायचे? हे स्त्रीयांना कायद्याच्या अभ्यासाने समजेल.स्त्रीयांमधील शक्ति हाच
स्त्रिचा खरा अधिकार आहे.
यावेळी स्त्री संघटनांमुळे स्त्रीयांच्या समस्यांना वाचा फ़ुटेल व आधार मिळेल तसेच कायद्यातील उणीवांचा अभ्यास करता येईल.
-प्रा.सुधा दिनकर पाटील.
---------------------------------------------------------------------
जळगावचे प्रसिध्द व विख्यात साहित्यीक स्व.प्रा. राजा महाजन सरांना
भाव सुमनांजली
(आहिराणीचा राजा गेला....
साहित्यिक हळहळले आहिराणी
भाषा माऊलीने डोळ्यातल्या
आसवांना वाट मोकळी केली...)
आहिरानी मायना राजा
मायले ईसरना
यानी लिन्ही गरुड झेप
उडीसन दूर गया
राननी डहायी राजासंगे
हाले - डुले
मोर - तितुर ह्याना संगे
नातं जोडे
मिठास वानी यानी
गुलाब संगे हसे
निंघनी वरात
गझलना जोडे बठे
जगन्नाथना रथ
रस्ता भरी चाले
सुर्यानी लेक
डोया झाकीसन दखे
साधा सुधा राजा
याना येवाना गाजावाजा
शांताबाई दूरथाईन
दखे पतीव्रता
आहिरानी मायनी
सेवा जलमभरी करी
हिरा मन्हा लखलख्नना
शिरना मुकुटवरी
उजेड दायीसन
मायना पांग फ़ेडा
हिरदना खजीना
समदासाठे लुटी दिन्हा
खिडकीमा बठीसन
दूर आभाय झांके
तारकास्ना संगे
पहाट उजाडे
राजाना राजबन्सी थाट
कीर्ती, पैसाले
फ़िरायी दिधी पाठ
निंधनी पालखी
समदास्ले उनं रडू...!
मुक्ताले सांगे
मनी वाट नको
दवाडू...
रचना: प्रा.सुधा दिनकर पाटील.
Tuesday, December 11, 2007
शब्दांची दूनिया
जीवन म्हणजे
Monday, December 10, 2007
ती आणि तो......
Sunday, December 9, 2007
माझे आजचे विचित्र स्वप्न ! ई-बाबांचा ब्लाँगर्द आर्शीवाद !! ई-बाबां भन्नाट आर्शीर्वाद “ हास्य मेव जयते ! ”..

बघता बघता माझा मराठी ब्लाँग ..या वयाचा झाला.खरं म्हणजे मी ब्लाँग तयार करण्यासाठी बराच लाँजिकल खटाटोप
केला.
अगदी आज मला पहाटे पहाटे एक विचित्र स्वप्न पडले ,अन पहाटेचे स्वप्ने खरी होतात अशी माझी धारणा आहे.
माझ्या स्वप्नात आज एक साधूबाबा आलेत. यांचा पोषाख हा निलवस्त्र परिधान केले्ला होता. साधूबाबांच्या दाढीत अनेक ईमेल अडकले असावेत अशी त्यांची मोठी दाढी होती.
मी त्यांना म्ह्टले आपण कोण?
ते म्हटले “ माझे नाव ई-बाबा आहे ! ”
या ई-बाबांच्या आजुबाजुला धूर निघत होता. त्यांना म्हटले आपण माझ्या स्वप्नात येण्याचे प्रयोजन काय?
तर हे ई-बाबां म्ह्टले “ वत्सा ! तुझ्या मराठी ब्लाँगला मी भेट दिली. वा SS वा SS छान हं ! कौतुक करावेसे वाटले..
म्हणून तुला भेटायला आलो.
मी फ़क्त हास्य व्यंग मराठी ब्लाँगरलाच भेट्तो हं ! ”
माझ्या सोबत माझा मित्रही त्या स्वप्नात माझ्या सोबत होता. हा मित्र अत्यंत खोडसाळ !याचे लक्ष त्या ई-बाबांच्या
आजुबाजुला गेले .बस्स याचे तोंड ऊघडलेच !
हा म्हट्ला काय हो ई-बाबा तुमच्या आजुबाजुला ह्या रंभा नि अप्सरा कोण?
माझ्या मित्राला यावेळी मी खूप चिमट्या घेतल्या !
ई-बाबा चिडलेत !! हं हा कोण पॄथ्वीवरचा पंचंरकुणीकडला !! मला प्रश्न करणारा हा कोण ऊपटसूंभ?
मग ई-बाबांच लक्ष मी दूस-या मूद्द्यावर नेलं.
मी म्हटलं ई-बाबा आपण काही मला सांगणार होता ना?
ई-बाबा म्हट्ले अरे हो ..
आपली तुझ्या ब्लाँगविषयी चर्चा चालू होती..ना!
तुझ्या ब्लाँगचे नाव तु बदलवून “ हास्य मेव जयते !” अस लिही. माझा स्वतःचा म्हणजे ई -बाबांचा तुला वरदहस्त लाभला आहे.मग माझ्या डोक्यातून बरेच html व java script चे प्रकाशपूजं बाहेर पडतांना दिसले.
ह्या ई-बाबां भन्नाट आर्शीर्वाद मिळाला “जा वत्सा ई-नोदी लिखाण कर!!”
बरं माझा हा मित्र म्हटला “ काय हो ई-बाबा याने काही ई म्हणजे तसले लिखाण केले तर ?
हे ई-बाबा पून्हा चिडलेत...ई--ई...ई !!
कोण हा मूर्ख मला सारखा खेटतोय! कसले पाणचटं ओयासिस ई-नोद करतोय ?
रंभा नि अप्सरा डोक्यावर पटकन पदर घ्या ??....
हे पाहून मी म्हटले“ ई-बाबा ह्याच्या( म्हणजे माझ्या मित्राच्या) मनात तसे काही नाही हं भोळा सांब आहे ..”
ई-बाबा म्हटले अरे तसे नाही रे ! वरुन सर्व्हरच्या बाजुने ई-मदन ऋषी जात आहे ... माझ्या रंभा नि अप्सरांवर
त्यांचे ई-बाण सूटतील ... म्हणून मी असे म्हटले की रंभा नि अप्सरा डोक्यावर पदर घ्या...!
माझा हा मित्र काही तरी बोलणार तितक्यात मी त्याच्या तोंडांत चक्क बोळाच कोबंला !
ते म्हटले तूझ्या मित्राचा ई-गो कमी करावा लागले..काय तो मित्र आहे...!!
नसता ह्या ई-बाबांचा कोप व्हायचा..मनात मी म्ह्टलं !
जाता जाता ह्या ई-बाबांना मी http तसेच www हुं म्हणत नमस्कार केला .
मी म्हटले ई-बाबां आपण पून्हा केव्हा मला भेटणांर ??
ते म्हटले तु माझी ज्या-ज्या वेळी आठवण काढशील त्या-त्या वेळी मी हजर असेल...!
ई-बाबांना म्हटले “ धन्यवाद !..”
माझा डोळा सकाळी सकाळी ऊघडला ...समोर पहातोत काय ? घड्याळात चक्क सकाळ्चे आठ वाजले होते.
माझे ई-बाबांमूळे ई-मय होऊन चिकटलेले डोळे ऊघडतांना मी मात्र ई-ई..करत होतो.
बर ह्या ई-बाबांच्या म्हणण्यानुसार मी आता माझ्या मराठी ब्लाँगच बारस करत आहे.
माझ्या मराठी ब्लाँगच नाव ठेवल आहे “ हास्य मेव जयते ! ”
जय हो ss ई-बाबांची...जय हो ss
प्रा.सचिन दिनकर पाटील.
Saturday, December 8, 2007
भेटलेली माणसं
Thursday, December 6, 2007
Good and Happy thoughts.

Good and Happy thoughts.
To shape your desire please turn to back page
* You can`t spell S cesses
Without `U`
* Never put off till tomorrow what you can do Today.
* House is built by Material but home is built by Heart.
* You fool the people for some time and some people for all time but
you cannot fool the people all time.
- Abrahm lincoln
* One man can Take the horse to the water but a thousand can not make him Drink.
* If you will pay peanut you will get monkeys to work.
* Indians are wise they use their own Glass
प्रा.सचिन दिनकर पाटील.
आजचा s.m.s
काही मजेदार गोष्टी
Tuesday, December 4, 2007
आम्ही ब्लाँगर ब्लाँगर
आम्ही ब्लाँगर ब्लाँगर
या ईटंरनेटची पाखंर!
मराठी दूनियेवर नजर
मराठी ब्लाँग जगात सर्वदुर..
प्रा.सचिन दिनकर पाटील.
नमस्कार मंडळी,
आमचा राम राम घ्या वा की,
मराठी ब्लाँग नेट आज जगात सर्वदुर पाहिला जातो. मराठी विश्वातला हा ब्लाँग लई झक्कास आहे. मराठी ब्लाँग
सुरु करण्यासाठी मला या मराठी ब्लाँग नेटमूळेच मार्गदर्शन मिळाले.व्यवस्थापक मंडळीचे आभार मानावे तितके कमीच आहे.
मराठी ब्लाँग नेटमूळेच आपले सर्वांचे लेख जगाच्या कानाको-यात एका क्षणात पोहोचतो शिवाय याच्यामूळेच आपल्या साहित्याचे
सागोंपांग दर्शन मराठी ब्लाँगच्या वाचकाला होतो. पण एक लक्षात घ्या की या मराठी ब्लाँग नेटमूळेच निर्माण झालेले मराठी माणसांचे सर्कल फ़ार वाढत आहे मग मराठी ब्लाँग नेट मध्ये प्रसारित झालेल्या लेखांना वाचकांनी comments म्हणजे प्रतिसाद देण्यास एवढी कंजूषी का करावी? जय महाराष्ट्र! मराठी बाणा आपण का विसरतो ? नाही का??
गुड, टू गुड ,मिडिअम ,एवढी प्रतिक्रिया आपण जरुर देऊ शकतो ! ते सुध्दा नेट सर्फ़िंग करता करता.
सर्वच मराठी लेखकांचे ब्लाँगवरचे साहित्य खूप छान असते. त्यासाठी सर्वच ब्लाँग कर्ते आपापल्या परिने आपला ब्लाँग सजविण्यात मश्गूल आहेत.
खंरच मराठी ब्लाँग नेटवर मालिकांची एक जत्राच भरते.एक ज्ञानपूर्ण ,मनोरंजनाने भरलेली हा मराठी ब्लाँग नेट आता विशेष लोकप्रिय होत आहे. त्यांनाही मी शूभेच्छा देतो.
पूढे हा मराठी ब्लाँग दरवेळी अजून नवनवीन काही घेऊन येईल आणि हो आता तर २७ दिवसांनी हे वर्ष संपणार..
मग २००८ काय घेऊन येईल हे नवीन वर्षच ठरवणार !
चला मंडळी .. लई रात्र झाली...तुम्ही ही झोपा.. ऊद्यालाच ऊठा की... सकाळी आहेच आपल्या सेवेला मराठी बाणा..
चला मंडळी..भेटु तर मग ऊद्यालाच!
जय महाराष्ट्र !
जाता जाता एक चारोळी वजा आरोळी..
कॄत्रिम नाते
पैशावर बहरतात...
पैसा गेला की
ह्ळूवार
ती ही निसटतात...!
प्रा.सचिन दिनकर पाटील.
या ईटंरनेटची पाखंर!
मराठी दूनियेवर नजर
मराठी ब्लाँग जगात सर्वदुर..
प्रा.सचिन दिनकर पाटील.
नमस्कार मंडळी,
आमचा राम राम घ्या वा की,
मराठी ब्लाँग नेट आज जगात सर्वदुर पाहिला जातो. मराठी विश्वातला हा ब्लाँग लई झक्कास आहे. मराठी ब्लाँग
सुरु करण्यासाठी मला या मराठी ब्लाँग नेटमूळेच मार्गदर्शन मिळाले.व्यवस्थापक मंडळीचे आभार मानावे तितके कमीच आहे.
मराठी ब्लाँग नेटमूळेच आपले सर्वांचे लेख जगाच्या कानाको-यात एका क्षणात पोहोचतो शिवाय याच्यामूळेच आपल्या साहित्याचे
सागोंपांग दर्शन मराठी ब्लाँगच्या वाचकाला होतो. पण एक लक्षात घ्या की या मराठी ब्लाँग नेटमूळेच निर्माण झालेले मराठी माणसांचे सर्कल फ़ार वाढत आहे मग मराठी ब्लाँग नेट मध्ये प्रसारित झालेल्या लेखांना वाचकांनी comments म्हणजे प्रतिसाद देण्यास एवढी कंजूषी का करावी? जय महाराष्ट्र! मराठी बाणा आपण का विसरतो ? नाही का??
गुड, टू गुड ,मिडिअम ,एवढी प्रतिक्रिया आपण जरुर देऊ शकतो ! ते सुध्दा नेट सर्फ़िंग करता करता.
सर्वच मराठी लेखकांचे ब्लाँगवरचे साहित्य खूप छान असते. त्यासाठी सर्वच ब्लाँग कर्ते आपापल्या परिने आपला ब्लाँग सजविण्यात मश्गूल आहेत.
खंरच मराठी ब्लाँग नेटवर मालिकांची एक जत्राच भरते.एक ज्ञानपूर्ण ,मनोरंजनाने भरलेली हा मराठी ब्लाँग नेट आता विशेष लोकप्रिय होत आहे. त्यांनाही मी शूभेच्छा देतो.
पूढे हा मराठी ब्लाँग दरवेळी अजून नवनवीन काही घेऊन येईल आणि हो आता तर २७ दिवसांनी हे वर्ष संपणार..
मग २००८ काय घेऊन येईल हे नवीन वर्षच ठरवणार !
चला मंडळी .. लई रात्र झाली...तुम्ही ही झोपा.. ऊद्यालाच ऊठा की... सकाळी आहेच आपल्या सेवेला मराठी बाणा..
चला मंडळी..भेटु तर मग ऊद्यालाच!
जय महाराष्ट्र !
जाता जाता एक चारोळी वजा आरोळी..
कॄत्रिम नाते
पैशावर बहरतात...
पैसा गेला की
ह्ळूवार
ती ही निसटतात...!
प्रा.सचिन दिनकर पाटील.
Monday, December 3, 2007
इंडिया मै ऎसा भी होता है!
गा-हाणी
नळावर पाण्या व्यतीरिक्त
होतात शुध्द गा-हाणी
बादली सोबत वाहून
आणली जातात
पठडीतील चवदार गाणी....!
प्रा.सचिन दिनकर पाटील.
नळावर पाण्या व्यतीरिक्त
होतात शुध्द गा-हाणी
बादली सोबत वाहून
आणली जातात
पठडीतील चवदार गाणी....!
प्रा.सचिन दिनकर पाटील.
Saturday, December 1, 2007
एक बंगला बने न्यारा !
एक बंगला बने न्यारा
चोवीस तास खेळावा
तिथे वारा..
ढेकूणांचा नको तिथे
पसारा...
डासांना नको
तिथे थारा..
चोहोकडे नकोच
नुसताच कचरा...
नकोच भिंती तिथे
बहराव्या हास्य धारा..
नकोच तिथे
सकंटांच्या परंपरा..
फ़क्त गवसावा
प्रेमाचा अखंड झरा...
-प्रा.सचिन दिनकर पाटील.
चोवीस तास खेळावा
तिथे वारा..
ढेकूणांचा नको तिथे
पसारा...
डासांना नको
तिथे थारा..
चोहोकडे नकोच
नुसताच कचरा...
नकोच भिंती तिथे
बहराव्या हास्य धारा..
नकोच तिथे
सकंटांच्या परंपरा..
फ़क्त गवसावा
प्रेमाचा अखंड झरा...
-प्रा.सचिन दिनकर पाटील.
Subscribe to:
Posts (Atom)






