Sunday, May 4, 2008

नवरा आणि बायको!




एक पती आणि पत्नी गप्पा करीत असतात ....पत्नी आपल्या पतीला म्हणते,.... ‘ऎ... जी’
ऎकतात का लक्ष देऊन ? मी काय म्हणते आहे??
पती म्हणतो ‘ बोला... लग्नानंतर आजपर्यंत माझे कान मी ऊघडेच ठेवले आहे म्हटलं !’
पत्नी म्हणते: ....रोजच्या सागंण्यापेक्षा हे स्पेशल सांगण आहे...
पती म्हणतो: सांगा तर मग !!
पत्नी: मी जर मेली तर माझ्यामागे आपण काय कराल?
पती:मी तर वेडा होईल बाई..!
पत्नी म्हणते: मुळ प्रश्न तर अजुन बाकी आहे ! ऎका तर.... ‘मी मेल्यानंतर तुम्ही पुन्हा दुसरे लग्न कराल का?’
पती म्हणतो: लक्षात ठेव ..... वेडा माणुस काहीही करु शकतो !

0 comments: