Tuesday, December 27, 2011

व्यर्थ भांडण..!


ट्रेन मध्ये खिड्कीच्या सीट वर बसलेल्या दोन स्त्रिया आपापसात भांडत असतात त्या भांडणात खिड्कीच्या सीटा जवळ बसलेली बाई तिच्या शेजारीच बसलेल्या बाईला म्हणते मला खुप गरम होत आहे.. खिडकीची काच ऊघडी ठेव....तर तिच्या बाजुला बसलेली बाई म्हणते मला तर थंडी वाजते आहे...खिडकीची काच बंद कर...एक म्हणते ऊघड ..दुसरी म्हणते बंद कर ...या भांडणात दोघीही एकमेकांचे केस उपटवण्या पर्यंत  भांडत असतात ... त्यांच्या समोर बसलेला गॄहस्थ त्या दोंघींना उद्देशून म्हणतो..."तुम्ही दोघी ज्या कारणाने भांडत आहात पण आता समोर बघाल तरी... खिडकीला
काच तरी आहे काय...?"


Monday, December 26, 2011

पतिदेव आणि जज्ज




जज्ज: हं, ‘ तर..., " तुझे म्हणणे आहे की तुझी पत्नी तुझ्या अंगावर भांडे फ़ेकत असते...!"
पति: हो, " साहेब..!"
जज्ज: किती दिवसापासुन फ़ेकते आहे..?
पति: सर लग्न झाल्याबरोबर ती भांडे फ़ेकत आलेली आहे...!
जज्ज: पण तु अगोदर तक्रार का केली नाहीस..?
पति: कारण कालच पहिल्यांदाच तिचा निशाणा बरोबर लागला...!

Saturday, December 24, 2011

ईसे दवाई कुट कुट कर देना


एक जण दुस-याला मारत असतो हे पाहुन तिसरा पहिल्याला विचारतो याला का बर मारत आहात...?
 तर पहिला त्यावर उत्तरतो: ओये ..डाँक्टरने सांगितले आहे की "ईसे दवाई कुट कुट कर  देनी है "

Wednesday, December 21, 2011

मुलगा आणि डाँक्टर अंकल


डाँक्टर; (पाच वर्षाच्या मुलाला म्हणतात) -बेटा हे औषध दिवसातुन चार चमचे रोज घेत जा...!
मुलगा: पण डाँक्टर अंकल ,आमच्या घरात तर फ़क्त दोनच चमचे आहेत...!

Saturday, December 17, 2011

परिक्षेत पास झालो तर काय द्याल..?



बेटा: बाबा जर मी परिक्षेत पास झालो तर काय द्याल..?
बाबा: अरे बेटा जर तु परिक्षेत पास झाला तर मी तुला एक सायकल देईन...!
बेटा: बाबा जर का मी फ़ेल झालो तर ?
बाबा: दहा सायकली मी देईन...!
बेटा: का बाबा..?
बाबा: कारण तु अभ्यास बंद करुन सायकल शाँप काढशील...!